श्रुती हसनचं नवं फोटोशूट चर्चेत, वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसतेय फारच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 02:53 PM2024-01-24T14:53:05+5:302024-01-24T15:10:48+5:30

अभिनेत्री श्रुती हसनच्या अदा पाहून तिचे चाहते घायाळ झालेत.

लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हसन नेहमीच आपल्या खास अंदाजाने चाहत्यांना वेड लावत असते.

अभिनेत्रीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

यामध्ये श्रुती हसन क्रॉप टॉप आणि पँटमध्ये फारच ग्लॅमरस दिसून येत आहे.

श्रुतीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन कानातले घातले आहेत.

या फोटोंमध्ये श्रुती हसन क्लासी अंदाजात पोज देताना दिसून येत आहे.

श्रुती हसनचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

श्रुती हसन नेहमीच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते आणि तिची स्टाईल इतरांपेक्षा खूप वेगळी आहे.

नुकतेच श्रुती सुपरस्टार प्रभाससोबत सालार या सिनेमात झळकली आहे.

तर सध्या ती नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रुती आता 'चेन्नई स्टोरी' या चित्रपटात दिसणार आहे. याचे दिग्दर्शन बाफ्टा विजेते फिलिप जॉन करत आहेत.