"श्रेयस अय्यर माझे पती असून.."; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:07 IST2025-06-09T09:50:57+5:302025-06-09T10:07:37+5:30
बिग बॉस फेम एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या विधानाची चांगलीच चर्चा आहे. श्रेयस माझे पती आहेत, असं विधान करत ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे

श्रेयस अय्यरने नुकत्याचं पार पडलेल्या IPL 2025 मध्ये चमकदार खेळी करत सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं. श्रेयसने पंजाब किंग्ज संघाचं कर्णधारपद भूषवलं. याच श्रेयसच्या प्रेमात बिग बॉस फेम अभिनेत्री आकंठ बुडाली आहे
बिग बॉस १८ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झालेली एडिन रोजने श्रेयसबद्दल एक विधान केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मी श्रेयसला मनोमन पती मानलंय, असं मोठं विधान एडिनने केलं आहे. इतकंच नव्हे तर श्रेयसच्या मुलांची मी आई आहे, असंही तिने मानलं आहे. एडिनच्या या विधानांची सध्या चांगलीच चर्चा आहे.
श्रेयस आणि एडिन यांची याआधी कधीही एकमेकांसोबत भेट झाली नाही. तरी एडिन श्रेयसच्या प्रेमात बुडाली असून हे प्रेम एकतर्फी आहे, याची तिला जाणीव आहे.
एका मुलाखतीत एडिन म्हणाली की, मी श्रेयसच्या मुलांची आई आहे, असं मी मानते. माझ्या मनात खूप आधीपासून मी श्रेयसशी लग्न केलं आहे. तो मला दररोज प्रेरणा देत असतो. श्रेयसची विनम्रता, त्याचा एकाग्रपणा आणि इतरांशी तो ज्या पद्धतीने बोलतो ते सर्व मला कौतुकास्पद वाटतं.
याविषयी श्रेयस अय्यरने एडिनला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. पण एडिनचं कोणतंही अपेक्षा नसलेलं श्रेयसबद्दलचं प्रेम सर्वांना थक्क करतंय
एडिनला क्रिकेटची आवड आहे. IPL 2025 मध्ये श्रेयस अय्यरने संपूर्ण हंगामात जी उत्तम कामगिरी केली, त्यामुळे एडिन त्याच्यावर भाळली आहे, असं म्हणायला हरकत नाही