संस्कृती जपणारी आदर्श जोडी! लघाटेंकडे अशी पार पडली श्रावणातील पूजा; मुग्धा-प्रथमेशचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:55 IST2024-08-09T16:44:14+5:302024-08-09T16:55:02+5:30
'सा रे ग म प' लिटील चॅम्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील गाजलेली जोडी आहे.

मुग्धा-प्रथमेशने आपल्या सुमधूर सुरांनी सर्वच प्रेक्षकांना भुरळ घातली.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली.

दोघंही आपल्या मराठी संस्कृतीला जपतात आणि हे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा जाणवतं. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर लघाटेंच्या घरी श्रावणातील पूजा पार पडली.

मुग्धाने याचे काही खास फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

या पूजेसाठी मुग्धा लाल रंगाची साडी नेसली आहे तर प्रथमेशने पितांबर परिधान केला आहे.

मुग्धा-प्रथमेशचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यांचा पारंपरिक लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

या फोटोंवर "संस्कृती जपणारी ,सर्वांना आपलं करणारी जोडी" अशी कमेंट एक नेटकऱ्याने केली आहे.

















