सेटवर जमल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कलाकारांच्या जोड्या, पाहा कोण आहेत रिल ते रिअल लाइफ पार्टनर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 07:00 AM2022-11-04T07:00:00+5:302022-11-04T07:00:00+5:30

मराठी कलाविश्वातील खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या या लोकप्रिय जोड्या माहित आहे का ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल

`नवरी मिळे नवर्‍याला' या सुपरहीट मराठी सिनेमामधून सचिन-सुप्रिया ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्यांची भेट झाली. चित्रपटाचे शूटींग संपल्यावर सचिन यांनी सुप्रिया यांना लग्नाची मागणी घातली. 1985 साली ते विवाह बंधनात अडकले. `बनवा बनवी', `माझा पती करोडपती', `नवरा माझा नवसाचा' अशा दर्जेदार मराठी सिनेमांमध्ये यांनी एकत्र काम केले. हिंदी रियालिटी शो `नच बलिये'च्या पहिल्या सिझनचे सचिन-सुप्रिया विजेते होते.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पास आऊट झालेल्या अतुल कुलकर्णी यांचा विवाह गीतांजली यांच्याशी 1996 साली विवाह झाला. गीतांजली देखील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या माजी विद्यार्थी असून त्यावेळी अतुल-गीतांजली दोघांची ओळख झाली होती.

उर्मिलाने `शुभ मंगल सावधान' या मराठी सिनेमामधून अभिनयाची सुरुवात केली. त्या सिनेमामध्ये आदिनाथ हा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. सेटवर झालेली ओळख वाढून त्यांनी काही वर्ष डेट केले. त्यानंतर २०११ साली लग्न केले. त्यांना जिजा नावाची मुलगी आहे. `दुभंग' आणि `अनवट' या सिनेमांमध्ये ही जोडी दिसली.

पर्ण आणि आलोक दोघेही पुण्याचे आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये दोघांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच दरम्यान त्यांनी काही एकांकिका, नाटक, लघुपटांमध्ये एकत्र काम केले. या दरम्यान त्यांच्यामध्ये प्रेम फुलले. काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. ही जोडी 2014 साली विवाह बंधनामध्ये जोडली गेली. `रमा-माधव', `कातळ' आणि `विहीर' या सिनेमांमध्ये ते दोघेही दिसले.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट - उमेश कामत. दोघे एकाच काॅलेजचे विद्यार्थी होते. उमेश हा त्यावेळी प्रियाचा सिनियर होता. एका कार्यक्रमामध्ये त्यांची ओळख झाली. त्यांनी तब्बल सहा वर्ष डेट केल्यानंतर 2011 साली लग्न केले. `टाइम प्लीज' या चित्रपटामध्ये तसेच `आणि काय हवं' या वेब शोमध्ये हे दोघं एक कपल म्हणून दिसले.

सखी आणि सुव्रत यांनी झी मराठी वाहिनीवरील `दिल दोस्ती दुनियादारी' या 2015 साली प्रदर्शित झालेल्या मालिकेतून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांनी `दिल दोस्ती दोबारा', `आठशे खिडक्या नऊशे दारं' या मालिकांमध्ये तर `अमर फोटो स्टुडिओ' नाटकामध्ये एकत्र दिसले. ते दिल दोस्ती दुनियादारीच्या शूटींग दरम्यान भेटले. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमांमध्ये होऊन त्यांनी 2019 साली लग्न केले. सखी ही प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आहे.

झी मराठीवरील `काहे दिया परदेस' या मालिकेमध्ये ऋषि प्रमुख भूमिकेत होता. तर ईशाने `जय मल्हार' मध्ये बानुचे पात्र साकारले होते. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या दरम्यान ते एकमेकांना भेटले. ईशाने ऋषिला प्रपोज केले. काही वेळ घेतल्यानंतर ऋषिने तिला हो म्हटले. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. इंस्ट्राग्रामवर हे कपल आपले फोटो शेअर करत असतात.

कॉलेजच्या दिवसात अंकुश आणि दिपा यांची एकमेकांशी ओळख झाली. कॉलेजमध्ये असताना ते दोघेही एकांकिकामध्ये काम करत होते. त्याचदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २००७ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

२००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती. याकाळात मकरंद यांचे शिल्पा यांच्यावर प्रेम जडले आणि त्यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली. शिल्पा यांनी लग्नासाठी होकार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोघांच्या घरातून अजिबात विरोध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबादमध्ये दोघांचे लग्न झाले.