Smita Gondkar : स्मिता गोंदकरने सांगितला किस्सा, म्हणाली, "मी त्याची गचांडी धरली अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 02:42 PM2023-05-10T14:42:37+5:302023-05-10T14:56:25+5:30

स्मिता गोंदकर 'बलोच' या सिनोमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) आगामी 'बलोच' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. स्मिता पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार असून प्रविण तरडेसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली आहे.

'पप्पी दे पारुला' या गाण्यामुळे आणि बिग बॉसमुळे स्मिता घराघरात पोहोचली. स्मिता लहानपणापासूनच ज्युडो, कराटेमध्ये पारंगत आहे. तिने त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. तर बलोच सिनेमात तिने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. लहानपणापासूनच शिक्षण घेतल्याने तिला हे सीन्स देणं सोप्पं गेलं.

स्मिताने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत लहानपणी कधी मारामारी केली आहे का या प्रश्नावर एक किस्सा सांगितला.

ती म्हणाली,"मी एकेकाळी खूप मारामारी करायचे आणि विशेषकरुन मुलांनाच मारायचे. मी राष्ट्रीय स्तरावर ज्युडो खेळायचे. माझ्या भावाने मला सांगितलं होतं की पोटाच्या वरचा असा भाग असतो ज्याठिकाणी जर बुक्की बसली बरोबर तर माणूस खाली पडेल. मग तुझा ज्युडो वगरे काही नाही."

स्मिता पुढे म्हणाली,"मला तो प्रयोग करुन बघायचा होता. मी वाटच बघत होते की कोणीतरी काहीतरी येऊन मला बोला रे मला मारुन बघायचंय.मी सातवी आठवीत असेन माझ्या रिक्षातला मुलगा ज्याला मी रोज बघते तो मला काहीतरी बोलला आणि मला संधी मिळाली. मी अशी त्याची गचांगडी पकडली आणि धपकन मारलं."

पुढे नंतर नववीत असताना एक मुलगा माझ्या वर्गाबाहेर येऊन बसायचा आणि माझ्याकडेच टक लावून बघत बसायचा. मला फार इरिटेट झालं. म्हटलं काय रे तुझे क्लास आहेत का इकडे असं म्हणून मी त्याची गचांडी पकडली आणि ज्युडोचा तो थ्रो ट्राय केला असं स्मिता म्हणाली.

बलोच सिनेमात स्मिता आणि प्रविण तरडे यांच्यावर रोमँटिक गाणंही शूट करण्यात आलंय ज्याची बरीच चर्चा आहे. हे गाणं करताना स्मितानेच आपल्याला सांभाळून घेतल्याचं प्रविण तरडे म्हणाले होते.

स्मिता खऱ्या आयुष्यात अतिशय हॉट आहे. तिने अनेक बिकीनी अवताराताील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर बलोच मध्या मात्र अगदी उलट पारंपारिक वेशभुषेत ती बघायला मिळत आहे.