'जय मल्हार' फेम 'ही' अभिनेत्री झळकणार 'संघर्षयोद्धा'मध्ये; साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:00 AM2024-03-05T11:00:36+5:302024-03-05T11:08:41+5:30

Sangharsh yoddha: मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार ही अभिनेत्री; 'जय मल्हार' मालिकेत साकारली होती मुख्य भूमिका

गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळेच त्यांचा हा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उतरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्षयोद्धा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून या सिनेमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

या सिनेमात अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणार आहे.

हळूहळू करत या सिनेमातील एक एका पात्रांवरील पडदा दूर होत आहे. यामध्येच आता या सिनेमात मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला. या सिनेमामध्ये जय मल्हार या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री मनोज जरांगे पाटील यांच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारणार आहे.

या सिनेमामध्ये लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरभी हांडे, मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

जय मल्हार या मालिकेनंतर सुरभी काही मोजक्या सिनेमांमध्ये झळली. त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र, आता या सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.