'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
By देवेंद्र जाधव | Updated: May 23, 2025 16:07 IST2025-05-23T15:38:40+5:302025-05-23T16:07:15+5:30
पंढरीची वारी या सिनेमात मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आठवतेय का? सध्या काय करतात त्या? जाणून घ्या

पंढरीची वारी हा सिनेमा चांगलाच गाजला. १९८८ साली आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं
आजही दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला हा सिनेमा हमखास लागतोच. या सिनेमात मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं
मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे नंदिनी जोग. नंदिनी यांनी पंढरीची वारी सिनेमात साकारलेल्या मुक्ताच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं
नंदिनी जोग यांनी पंढरीची वारी सिनेमानंतर 'कळत नकळत', 'वाजवू का', 'थांब थांब जाऊ नको लांब', 'दे धडक बेधकडक' अशा सिनेमांमध्ये अभिनय केला.
नंदिनी जोग सध्या काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. नंदिनी सध्या अभिनय क्षेत्रापासून काहीशा दूर आहेत
नंदिनी जोग मुळच्या अकोल्याच्या असून लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. अभिजीत जोग यांच्याशी त्यांनी लग्न करत संसार थाटला.
आजही दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरीची वारी सिनेमा पाहिला की लोकांना हमखास नंदिनी यांची आठवण येते.