निरागस चेहरा अन् बोलके डोळे! 'एलिझाबेथ एकादशी' मधील 'हा' बालकलाकार आठवतोय, आता काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:42 IST2025-08-26T15:32:12+5:302025-08-26T15:42:27+5:30

'एलिझाबेथ एकादशी' मधील ज्ञानेश आठवतोय? आता करतो 'हे' काम

परेश मोकाशी दिग्दर्शित 'एलिझाबेथ एकादशी' हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.

या चित्रपटात सायली भांडाकवठेकर, श्रीरंग महाजन, पुष्कर लोणकर तसेच नंदिता धुरी हे कलाकार झळकले.

यामध्ये बालकलाकार श्रीरंग महाजनने साकारलेली ज्ञानेशची भूमिका अनेकांना भावली.त्याने साकारलेल्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

निरागस चेहऱ्याचा हा बालकलाकार आता सध्या कुठे आहे, काय करतो? याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'एलिझाबेथ एकादशी' मधील हा बालकलाकार आता मोठा झाला असून त्याचा लूक पूर्णपणे बदलला आहे.

श्रीरंग महाजन 'एलिझाबेथ एकादशी'नंतर कलाविश्वातून गायब झाला. सध्या तो पुण्यात जॉब करतो.

पुण्यातच श्रीरंगने कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या तो कलाविश्वापासून दूर आपल्या पद्धतीने आयुष्य जगतो आहे. नुकतीच त्याने कलाकृती मीडियाला मुलाखत दिली त्यामध्ये त्याच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे.