पुण्यातील जाणकार काँग्रेस नेत्याची मुलगी मराठी सिनेसृष्टीत कमावतेय नाव! सौंदर्यासमोर बॉलिवूड नायिका फिक्या, ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:38 IST2026-05-12T16:22:37+5:302026-05-12T16:38:44+5:30

राजकीय नेत्याची मुलगी आहे 'ही' अभिनेत्री, गाजवतेय मराठी सिनेसृष्टी, कोण आहे ती?

बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतही असे अनेक कलाकार असे आहेत ज्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे.

त्यातील काहींना यश मिळालं तर काही इंडस्ट्रीतून गायबच झाले.

मराठी सिनेसृष्टीत नाव कमावून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.'पिंजरा' मालिकेतून संस्कृती बालगुडेने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

संस्कृती बालगुडेने अनेक मराठी मालिका, चित्रपट, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण, तुम्हाला माहितीये का संस्कृती एका राजकीय कुटुंबातून आली आहे.

पुण्यातील काँग्रेस नेते संजय बालगुडे यांची ती लेक आहे. संजय बालगुडे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जुने, जाणकार नेते आहेत.

आपल्या दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

संस्कृतीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'सांगतो ऐका', 'शॉर्टकट', 'निवडुंग', 'टेक केअर गुड नाईट', 'भय', 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना ती दिसली. 'काळे धंदे' या वेब सीरिजमध्येही संस्कृतीने काम केलं आहे.