नाकात कारवारी नथ, गळ्यात मोत्यांचे दागिने; हिरवी साडी नेसून गौरीने केली इंटरनेटवर हवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 05:00 PM2024-04-10T17:00:38+5:302024-04-10T17:08:08+5:30

गौरी नलावडे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची नायिका आहे.

'स्वप्नांच्या पलीकडले', 'सूर राहुदे' यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत गौरी नलावडे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं.

छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत अभिनेत्रीने चाहत्यांची मनं जिंकली.

मालिकाविश्व गाजवल्यानंतर गौरीने काही मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भुमिका साकारल्या.

'कान्हा', 'गोदावरी' या सिनेमांमध्ये काम करून तिने मराठी मनोरंजन विश्वात आपला दबदबा निर्माण केला.

अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून ती तिच्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिचे साडीतील काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर ''So pretty uff! '' अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सई ताम्हणकरने दिली आहे.

हिरवी साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज तसेच नाकात घातलेली कारवारी नथ तिला अगदी शोभुन दिसते. शिवाय या पारंपरिक पेहरावावर परिधान केलेल्या मोत्यांच्या दागिन्यांनी गौरीच्या सौंदर्यात भर घातली आहे.