मराठी कलाकारांनी घरच्या लाडक्या बाप्पाला असा दिला निरोप, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:31 PM2022-09-05T14:31:32+5:302022-09-05T14:37:42+5:30

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. तर दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन झालंय. याशिवाय आता ५ दिवसांच्या बाप्पांचं सुद्धा विसर्जन होत आहे. सेलिब्रिटींच्या घरच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालं आहे. पाहा मराठी कलाकारांच्या बाप्पाचं विसर्जन..

अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. तर निरोप देताना ती भावुक झालेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने लिहिलंय, तुला निरोप देताना माझं हृदय किती दुखतंय.माझी इच्छा आहे की मी तुला कधीही जाऊ देऊ नये!, लवकर परत ये.

यानंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालं आहे. यावर्षी त्यांनी नव्या घरात गणेशाची स्थापना केली होती. मितालीने पोस्ट शेअर करत लिहिलंय, निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी! पुढल्या वर्षी लवकर या!

अभिनेता भूषण प्रधानच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याने घरच्या घरीच इकोफ्रेंडली विसर्जन केलंय.

बालकलाकार मायरा वैकुळच्या घरच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालं आहे.

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या ५ दिवसांच्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन झालंय.

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे. निरोप देताना अभिज्ञा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तिने पोस्ट करत लिहिलं आहे, हे वर्ष खऱ्या अर्थाने खास होतं, माझा विघ्नहर्ता सगळे विघ्न त्याच्याबरोबर घेऊन गेला. हा कठीण काळ मागे टाकून पुढच्या वर्षी अधिक जोमाने तुझी सेवा करायची वाट बघू!!! बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या