गोबऱ्या गालांची, घाऱ्या डोळ्यांची 'ही' चिमुकली, आज गाजवतेय मराठी इंडस्ट्री; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:14 IST2026-04-28T12:05:36+5:302026-04-28T12:14:17+5:30
अभिनेत्रीने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज तिच्या सौंदर्यावर महाराष्ट्र फिदा आहे.

सेलिब्रिटींचे जुने, बालपणीचे फोटो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. त्यांचे हे फोटो पाहून त्यांना ओळखणंही कठीण होतं.

शाळेच्या गणवेशातील या चिमुकलीचा फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. गोबरे गाल, घारे डोळे आणि नाकावर राग असा तिचा क्युट फोटो आहे.

तिचे शाळेतीलही आणखीही काही फोटो तिने शेअर केले आहेत. गॅदरिंगमध्ये परफॉर्म करताना तर कधी बक्षीस घेतानाचा तिचा फोटो आहे.

काळा फ्रॉक घालून बसलेली ही गोंडस मुलगी आज मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर लहानपणीचे फोटो शेअर करते.

ही चिमुकली दुसरी कुणी नसून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘अप्सरा’ आहे. 'नटरंग' सिनेमातील तिचं 'अप्सरा आली' गाणं तुफान गाजलं.

'मितवा','गाढवाचं लग्न','क्षणभर विश्रांती', 'हिरकणी', 'नटरंग'पासून ते आता नुकताच आलेला 'तिघी' असे तिचे अनेक सिनेमे गाजले.

अभिनयासोबतच सोनाली उत्तम डान्सरही आहे. फुलवा खामकरसोबतचे तिचे अनेक डान्स व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात.

२०२१ साली सोनाली कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. कुणाल दुबईत असतो त्यामुळे सोनाली कधी दुबई तर कधी भारतात असते. नवऱ्यासोबत अनेक ठिकाणी ती व्हेकेशनवरही जाते.

















