क्या खूब लगती हो! स्पृहा जोशीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; हटके पोझमुळे फोटो आले चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:06 AM2023-12-12T11:06:17+5:302023-12-12T11:10:39+5:30

Spruha joshi: अलिकडेच स्पृहाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. आजवरच्या कारकिर्दीत स्पृहाने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या स्पृहाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारुन प्रेक्षकांची मन जिंकली.

स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या पर्सलन आणि प्रोफेशनल लाइफविषयी ती सातत्याने काही ना काही शेअर करत असते.

अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम कवयित्री सुद्धा आहे. त्यामुळे ती अनेकदा कविता वाचनाचे कार्यक्रमही करत असते.

अलिकडेच स्पृहाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्पृहाने वेस्टर्न आऊटफिटमध्ये हे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिचे हे फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

स्पहा पहिल्यांदाच अशा ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे.

या फोटोमध्ये स्पृहा कमालीची सुंदर दिसत आहे.