सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीये किशोरी गोडबोलेची लेक;पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:36 PM2023-08-21T13:36:09+5:302023-08-21T13:42:26+5:30

Kishori godbole daughter: किशोरीच्या लेकीचं नाव सई गोडबोले असं असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किशोरी गोडबोले. ९० चं दशक गाजवून या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.

'फुल थ्री धमाल', 'खबरदार', 'कोहराम' आणि 'वन रूम किचन' यांसारख्या कितीतरी सिनेमा, मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

किशोरीने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.

सध्या किशोरीचा मराठी कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती हिंदी मालिकांमध्ये आजही काम करताना दिसते.

सध्या सोशल मीडियावर तिच्या लेकीची चर्चा रंगली आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची लेक कलाविश्वात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

किशोरीच्या लेकीचं नाव सई गोडबोले असं असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.

सईने काही जाहिराती आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'फार मिलेंगे चलते चलते', 'इंतेजार' सारख्या चित्रपटात काम केलं आहे.

सई अभिनेत्री असण्यासोबतच एक गायिकादेखील आहे. सई सोशल मीडियावर कायम तिच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते.

सई लवकरच आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. 'तू मी आणि अमायरा', या नव्या कोऱ्या सिनेमातून ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.