वयाच्या पन्नाशीतही अश्विनी भावेंचं निखळ सौंदर्य; शेअर केले क्लासी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 18:45 IST2023-11-27T18:45:00+5:302023-11-27T18:45:00+5:30

Ashvini bhave: अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे फोटो शेअर करत असतात.

१९९० च्या काळात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.

आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. त्यामुळे आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.

अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.

'हिना', 'सैनिक, 'बंधन' या बॉलिवूड सिनेमात अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

अश्विनी भावे यांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य आजही २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असंच आहे.

अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे फोटो शेअर करत असतात.

अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे.त्यातील काही निवडक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.