जयवंत वाडकर यांच्या लेकीनं जिंकला ‘मिस पर्सनॅलिटी’चा खिताब, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 05:26 PM2022-08-22T17:26:33+5:302022-08-22T17:38:22+5:30

Jaywant Wadkar daughter Swamini Wadkar : मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयवंत वाडकर यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची चर्चा आहे....

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेता जयवंत वाडकर यांनी रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची चर्चा आहे.

जयवंत वाडकर यांनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका केल्या आहेत. जयवंत वाडकर यांची मुलगीदेखील अभिनेत्री आहे. तिचे नाव स्वामिनी वाडकर.

या स्वामिनीची सध्या चर्चा आहे. होय, नुकतीच पार पडलेल्या श्रावण क्वीन 2022 स्पर्धेत स्वामिनीने ‘मिस पर्सनॅलिटी’ हा खिताब जिंकला आहे.

जयवंत वाडकर यांनी स्वत: ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर अनेक मराठी सेलिब्रिटींनी स्वामिनीवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

जयवंत वाडकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव तन्मय आहे तर मुलीचे नाव स्वामिनी आहे.

स्वामिनी वाडकर सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते.

स्वामिनी एक उत्तम बेली डान्सर देखील आहे. ती डान्सचे व्हिडीओदेखील इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच चाहत्यांना भुरळ घालतो.

जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचं ठरवलं आहे.

स्वामिनीने महेश मांजरेकरांच्या ‘एफ यू’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तसेच सचिन पिळगावकर यांच्या ‘ये है आशिकी’ या चित्रपटातही ती झळकली.