महाराष्ट्राला हसवून हसवून वेड लावणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डेंचे 'हे' दर्जेदार चित्रपट एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 03:05 PM2023-10-26T15:05:06+5:302023-10-26T15:43:08+5:30

मराठी सिनेसृष्टीमध्ये ज्यांचे मोलाचे योगदान आहे असे लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती आहे.

धुम धडका हा 1985 साली प्रदर्शित झाला. यात महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

दे दना दन हा १९८७ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.

२३ सप्टेंबर १९८८ दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एवढी वषे उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. ह

'हमाल दे धमाल' मधील हा चित्रपट सर्व मराठी रसिकांच्या मनामनात घर करुन राहिला आहे. 1989 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

'बाळाचे बाप ब्रह्मचारी' हा सुपरहिट चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना आता पाहता येणार आहे.

एका पेक्षा एक हा चित्रपट तुम्ही यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

धडाकेबाज हा १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. 'धडाकेबाज' चित्रपट आजही रसिकांच्या चांगलाच लक्षात आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनयाने या चित्रपटाने रसिकांची पसंती मिळवली होती. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

शेम टू शेम हा चित्रपट 1991 साली प्रदर्शित झाला होता. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना आता हा सिनेमा पाहता येणार आहे.

१६ एप्रिल १९९३ मध्ये 'झपाटलेला' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला तुफान लोकप्रियता मिळाली होती. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.