मराठमोळ्या या अभिनेत्री डेब्यूच्या वेळी कशा दिसत होत्या, पाहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 07:00 AM2022-12-08T07:00:00+5:302022-12-08T07:00:00+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री पदार्पणाच्या वेळी इतक्या वेगळ्या दिसत होत्या की ओळखणं कठीण होईल.

होणार सून मी या घरची मालिकेतून जान्हवीच्या भूमिकेतून घरोघरी पोहोचलेली तेजश्री प्रधान चित्रपटांतही झळकली आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर हिने नवरा माझा नवसाचामध्ये साकारलेली व्हीजेची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे पवित्रा रिश्ता मालिकेतून घराघरात पोहचली होती.

तुझी माझी रेशीमगाठमधील नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे प्रसिद्ध हिंदी मालिका पवित्रा रिश्तामध्ये झळकली होती.

मृण्मयी देशपांडे हिने अग्निहोत्र मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिची कुंकू मालिकेतील भूमिकाही गाजली होती.

मृणाल दुसानिसने माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिकेतून पदार्पण केले होते, यानंतर झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेतून तिची मंजिरी भूमिका चांगलीच गाजली होती.

हृता दुर्गुळे हिने दुर्वा या भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर फुलपाखरू ही मालिकाही हृताची गाजली होती. नुकतेच तिने अनन्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून लोकप्रिय झाली. याआधीही तिने चित्रपटातून काम केले होते. पण रेशीमगाठी मालिकेतील मेघनाच्या भूमिकेतून तिला खरी ओळख मिळाली.

प्रिया बापटने चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले होते. संजय दत्तच्या मुन्नाभाई एमएमबीबीएसमध्ये प्रिया बापटची छोटी भूमिकाही लक्षात राहणारी ठरली.

अक्षया देवधरने तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठक बाईंंच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आजही लोक तिला याच नावाने ओळखतात.