'लागिर झालं जी'ची शितली सध्या काय करतीये? मालिकेत गावरान तडका दाखवणारी शिवानी खऱ्या आयुष्यात आहे बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:00 AM2022-06-07T07:00:00+5:302022-06-07T07:00:07+5:30

Shivani baokar: 'लागिरं झालं जी' या मालिकेत शितल पवार अर्थात शितली ही भूमिका साकारुन ती प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील तिचा अंदाज प्रत्येकालाच भावला होता.

लागिरं झालं जी या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.

या मालिकेत शितल पवार अर्थात शितली ही भूमिका साकारुन ती प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील तिचा अंदाज प्रत्येकालाच भावला होता.

लागिरं झालं जी या मालिकेनंतर शिवानी अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकली. तसंच सध्या ती कुसुम या मालिकेत पाहायला मिळत आहे.

शिवानी कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मालिकेत साधीभोळी दिसणारी शिवानी खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

शिवानीला भटकंतीची विशेष आवड आहे. त्यामुळे ती नवनवीन ठिकाणांना भेट देत असते.

शिवानीच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो.

शिवानी खऱ्या आयुष्यात अत्यंत नम्रपणे वागत असल्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं.