कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:04 IST2025-09-23T12:59:24+5:302025-09-23T13:04:09+5:30
नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच निमित्ताने टीव्हीवरील अत्यंत लाडका शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गांबाबत जाणून घेऊया.

नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच निमित्ताने टीव्हीवरील अत्यंत लाडका शो असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गांबाबत जाणून घेऊया.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करणारी प्राजक्ता माळी उत्तम अभिनेत्री आहे. पण अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता एक बिजनेसवुमनही आहे. तिचा ज्वेलरीचा ब्रँड आहे. याशिवाय प्राजक्तराज हा कवितासंग्रह तिने प्रकाशित केला आहे.
बोल्ड बिनधास्त आणि ब्युटिफूल अभिनेत्री सई ताम्हणकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं परिक्षण करते. सईने तिच्या अभिनयाने बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. यापैकीच एक म्हणजे शिवाली परब. शिवालीने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे.
सध्या दशावतार सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली प्रियदर्शिनी इंदलकर उत्तम अभिनेत्री आहे. प्रियदर्शिनीने फुलराणी, चिकीचिकी बूबुमबूम, नवरदेव बीएसी अॅग्रिकल्चर, सोयरिक यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
वनिता खरात ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे घराघरात पोहोचली. शाहीद कपूरच्या कबिर सिंग सिनेमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे नम्रता संभेरावला लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतून नम्रताने तिच्या अभिनयाचं कसब दाखवलं. नाच गं घुमा या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.
चेतना भट हीदेखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची गुणी अभिनेत्री. चेतना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं.
अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलेली रसिका वेंगुर्लेकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचली. आता ती वडापाव सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ईशा डेला प्रसिद्धी मिळाली. ईशाने लंडन स्कूल ऑफ ड्रामामधूनच अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. आश्रम या वेब सीरिजमध्येही ती झळकली होती.