समीर चौघुलेंनी केलंय हेअर ट्रान्सप्लांट, खर्च केलेत लाखो रुपये, म्हणाले- "लोकांना निदान माझ्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:24 IST2025-06-30T15:02:31+5:302025-06-30T15:24:40+5:30

एकदा चाहत्याने समीर चौघुलेंना थेट त्यांच्या हेअर ट्रान्सप्लांटवरुन प्रश्न विचारला होता. "हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला?" असा प्रश्न या चाहत्याने विचारला.

अभिनयाला विनोदाची झालर लावत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील स्टार अभिनेता समीर चौघुलेंचा आज वाढदिवस आहे.

प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे समीर चौघुले प्रेक्षकांना त्यांच्या घरातलेच वाटतात.

कमी वयातच समीर चौघुलेंच्या डोक्यावरचे केस गेले. यावरुनही ते अनेकदा विनोदनिर्मिती करताना दिसतात.

एकदा चाहत्याने समीर चौघुलेंना थेट त्यांच्या हेअर ट्रान्सप्लांटवरुन प्रश्न विचारला होता. "हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला?" असा प्रश्न या चाहत्याने विचारला.

मात्र, समीर चौघुलेंनी हा प्रश्न पॉझिटिव्हरित्या घेत या चाहत्याला प्रामाणिकपणे उत्तर दिलं होतं.

"हा खरंच तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारला आहे. लोकांच्या मनात मी पॉझिटिव्हीटी निर्माण करतोय".

"लोकांना निदान माझ्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करावंस वाटतं हादेखील एक पॉझिटिव्ह भाग आहे".

"आता माझी काय हेअर ट्रान्सप्लांट करण्याची एजन्सी नाही. त्यामुळे मी काही ठराविक रक्कम सांगू शकत नाही. पण, मला साधारणपणे ३ लाखांपर्यंत खर्च आला".

"आता सध्या हेअर ट्रान्सप्लांट करणं स्वस्त झालं आहे. पण, आताची किंमत मला माहित नाही", असं समीर चौघुले म्हणाले होते.