India's Got Latent फेम समय रैना Insta वर एकाच व्यक्तीला करतो फॉलो, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:02 IST2025-02-12T18:43:07+5:302025-02-12T19:02:56+5:30

समय रैना इन्स्टाग्रामवर एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?

समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटेंट (India's Got Latent) सध्या वादात अडकलाय. या शोमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहबादीया पाहुणा म्हणून आला होता. त्याने आई-वडिलांसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं. यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. यामुळे सध्या सगळीकडे समय रैनाची चर्चा (India's Got Talent Controversy) सुरू आहे.

'इंडियाज गॉट लेटेन्ट' हा शो होस्ट करणाऱ्या समय रैनाचे इन्स्टाग्रामवर तब्बल ६० लाख अर्थात ६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

मात्र, समय हा केवळ एकाच व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. समय कोणत्या एका व्यक्तीला फॉलो करतो तुम्हाला माहितेय का? 'ती' व्यक्ती नेमकी कोण? हे आपण जाणून घेऊया.

२७ वर्षीय समय हा मुळचा जम्मूचा आहे. युट्यूबर असण्यासोबततच तो एक लोकप्रिय भारतीय स्टँडअप कॉमेडियनदेखील आहे.

वयाच्या १६ व्या वर्षीपासून कॉमेडी करत होता. आपले व्हिडीओ शूट करुन तो युट्यूबवर टाकायचा. कॉमेडी व्यक्तिरिक्त समयला बुद्धिबळ देखील आवडतं.

२०१९ साली 'अ‍ॅमेझोन प्राइम व्हिडीओ'वरील लोकप्रिय कॉमेडी शो 'कॉमिकस्तान सीझन २' हा शो समयने कॉमेडियन आकाश गुप्ताबरोबर जिंकला होता. त्यानंतर अनेक शोमधून समयने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

इंजिनिअरींगचा विद्यार्थी असलेला समय 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. पण, याच शोमुळे त्याचं भवितव्य अडचणीत आलं आहे. त्याचे सोशल मीडियावर फॉलोअर्स घटत चालले आहेत.

समयच्या युट्यूबवर ७ मिलियन ( ७० लाख ) सब्सक्रायबर्स असून इन्स्टाग्रामवर ६ मिलियन ( ६० लाख ) फॉलोअर्स आहेत. पण समय इन्स्टाग्रामवर एकाच व्यक्तीला फॉलो करतो.

समय रैना इन्स्टाग्रामवर फॉलो करणारी 'ती' व्यक्ती राखी सावंत (Samay Raina Follow Rakhi Sawant) आहे. राखी सावंत ही समयच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाली होती.

दरम्यान, समयची महिन्याची कमाई जवळपास दीड कोटी असल्याचं सांगण्यात येतंय. त्यात जाहिराती, सब्सक्राईबर्स आणि सुपरचॅटच्या माध्यमातून समय पैसे कमावतो. India got Latent चा त्याच्या कमाईचा मोठा सोर्स आहे. शोमधील काही खास आणि वादग्रस्त कंटेंट फक्त 'मेंबर्स ओन्ली' प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यात चाहते पैसे देऊन सब्सक्रिप्शन खरेदी करतात. ज्यामुळे त्यांची कमाई आणखी वाढते.