केळीच्या पानांची सजावट अन् सुंदर मूर्ती, लग्नानंतर रेश्मा शिंदेने घरी आणले गणपती बाप्पा, शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:04 IST2025-08-29T13:55:24+5:302025-08-29T14:04:19+5:30
यंदा अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या घरीही गणरायाचं आगमन झालं आहे. लग्नानंतर रेश्मा शिंदेचा हा पहिला गणेशोत्सव आहे.

बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे वातावरण मंगलमय झालं आहे. दरवर्षी सेलिब्रिटींच्या घरीही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो.
यंदा अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या घरीही गणरायाचं आगमन झालं आहे. लग्नानंतर रेश्मा शिंदेचा हा पहिला गणेशोत्सव आहे.
रेश्माने पती पवनसोबत गणरायाची पूजा करत बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशोत्सवाचे खास फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
गणपती बाप्पासाठी रेश्माने खास केळीच्या पानांची आरास केल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
"लग्नानंतरचा पहिला बाप्पा..पहिलं पावन आगमन– आनंद, श्रद्धा आणि नव्या सुरुवातीचा मंगलमय क्षण! मोरया", असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
रेश्माने गणेशोत्सवासाठी खास पारंपरिक लूक केला होता. साडी नेसून रेश्मा खास तयार झाली होती.
लग्नानंतर पहिल्यांदाच रेश्माने घरी गणरायाची स्थापना करत गणेशोत्सव साजरा केला आहे.