Memes Viral : ह्यां... हे म्हणजे फाटलेलं दूध! सल्लू भाईच्या ‘अंतिम’चा ट्रेलर बघून नेटकरी सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:56 PM2021-10-27T17:56:39+5:302021-10-27T18:08:21+5:30

Antim Trailer : ‘मुळशी पॅटर्न’या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. मात्र याच चित्रपटाचा हिंदी रिमेकच्या ट्रेलरने चाहत्यांची निराशा केलेली दिसतेय. सोशल मीडियावरचे मीम्स पाहून तुम्हीही हेच म्हणाल.

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा मराठीतील ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक आहे, हे तुम्हाला सांगायला नकोच. मग काय? तुलना तर होणारच

‘अंतिम’चा ट्रेलर पाहून नेटक-यांनी अशी काय तुलना केली आहे की, हसून हसून तुमचंही पोट दुखेल. होय, अंतिमचा ट्रेलर प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत.

ह्यां... पांचट माल हाय...

हा खरचं पुण्याचा आहे का?

पुना नाही रे पुणे...‘णे’... भाषा शुद्ध हवी

तुझं हसणं बंद होईल...

सल्लू भाई अब ‘हरीण’ समझ के मार दो हमको

कसला घाण बनवलायं सिनेमा आपला...

फ्लॉप व्हायची तयारी ठेवा... फ्लॉप व्हायची

कुठे ते फाटलेलं दूध आणि कुठे केशरी बासुंदी