दुपारी जेवणात चिकन तर रात्री...; 'न्यू मॉम' कियारा 'वॉर २'मध्ये बोल्ड दिसण्यासाठी काय खायची?

By देवेंद्र जाधव | Updated: July 31, 2025 15:31 IST2025-07-31T15:13:38+5:302025-07-31T15:31:10+5:30

कियारा अडवाणीच्या फिटनेस ट्रेनरने यामागचं रहस्य सर्वांसोबत शेअर केलं. इतकंच नव्हे कियाराचा संपूर्ण डाएट प्लॅन सांगितला

कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. कियाराला लवकरच 'वॉर २' सिनेमातून आपण पाहणार आहोत

कियारा नुकतीच आई झालेली आहे. आई झालेल्या कियाराला 'वॉर २'मध्ये हॉट आणि बोल्ड अदांमध्ये पाहून सर्वजण थक्क झालेत

कियाराने 'वॉर २'साठी खूप मेहनत घेतलेली दिसतेय. हॉट आणि बोल्ड फिगर मिळवण्यासाठी कियाराने तिच्या डाएटमध्ये मोठे बदल केले होते

कियाराच्या डाएटिशिअनने याविषयी खुलासा केला. तिच्या म्हणण्यानुसार, कियाराच्या दिवसाची सुरुवात पॅनकेक्सने व्हायची. या केकमध्ये प्रोटिन पावडर, ओट्स आणि अक्रोड समाविष्ट असायचं. यामुळे कियाराला प्रोटिन मिळायचं शिवाय तिची भूकही भागायची

याशिवाय दुपारच्या जेवणात कियारा चिकन, पातळ रस्सा आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायची. तिचं शूटिंगचं वेळापत्रत ज्यानुसार असेल तसं तिच्या जेवणाची योजना आखलेली असायची

यानंतर कियारा व्यायाम करायची. व्यायाम केल्यानंतर ती सातूच्या पिठापासून बनवलेलं ताक प्यायची. यामुळे तिच्या शरीराला थंडावा मिळायचा. याशिवाय हाडांनाही पोषण मिळायचं

अशाप्रकारे कोणतीही विशेष मेहनत न घेता कियारा अडवाणी साधं तरीही हेल्दी जेवण खायची. यामुळे दिवसभर तिच्यात एनर्जी टिकून असायची.