"पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण..", अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:58 IST2025-04-25T11:23:26+5:302025-04-25T11:58:15+5:30
पिझ्झा, बर्गर सारखे बाहेरचे पदार्थ खाऊनही अभिनेत्याचं वजन वाढायचं नाही. मग हा अभिनेता वजन वाढवण्यासाठी जीममध्ये व्यायाम करायचा. या लोकप्रिय अभिनेत्याने जो खुलासा केला त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. कोण आहे हा अभिनेता?

हा अभिनेता जीममध्ये कसून व्यायाम करायचा. अनेकजण जीममध्ये वजन कमी करण्यासाठी पण या अभिनेत्याने वजन वाढण्यासाठी जीम लावली होती.
या अभिनेत्याचं नाव आहे विकी कौशल. विकी कौशल त्याच्या एका सिनेमानिमित्त जेव्हा केबीसीमध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याने हा खुलासा केला होता.
काहीही खाऊन विकीचं वजन वाढत नाही. इतकंच नव्हे पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड खाऊनही विकीचं वजन 'जैसे थे'च असतं.
त्यामुळे वजन वाढवण्यासाठी विकीला जीम लावावी लागते. वजन वाढवण्यासाठी मग विकी वाफवलेल्या भाज्या आणि कंटाळवाणे पदार्थ खायचा. अशाप्रकारे विकीचं शरीर त्याला उलट्या पद्धतीने साथ देत असल्याचा गंंमतीशीर खुलासा त्याने केला.
"काहीही खाऊन वजन न वाढणं ही पंजाबींसाठी चांगली गोष्ट आहे", असं विकी केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांना म्हणाला होता
विकीने नुकतंच 'छावा' या सिनेमात अभिनय केला. या सिनेमात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती
'छावा' सिनेमाने जगभरात ७०० कोटींहून जास्त कमाई केली. या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून 'छावा' सिनेमाकडे पाहिलं जातंय.