Cannes 2024 : फ्रॅक्चर हात घेऊन रेड कार्पेरटवर अवतरली विश्वसुंदरी! ऐश्वर्याचा जलवा पाहून चाहतेही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:00 AM2024-05-17T10:00:19+5:302024-05-17T10:04:28+5:30

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननेही कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. हाताला दुखापत झालेली असतानाही ऐश्वर्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.

यंदाही रेड कार्पेटवर बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सिताऱ्यांचा जलवा पाहायला मिळाला.

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननेही कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. हाताला दुखापत झालेली असतानाही ऐश्वर्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याने तिच्या फॅशनचा जलवा दाखवला.

काळ्या रंगाचा डिझायनर लाँग गाऊन घालून ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली.

एवढंच नाही तर रेड कार्पेटवर फ्रॅक्चर हात फ्लॉन्ट करत ऐश्वर्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

हाताला दुखापत झालेली असूनही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्याने ऐश्वर्याचं कौतुक होत आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्याचे रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.