परी हूँ मैं! फदर गाउन घालून रॉयल लूकमध्ये Cannesच्या रेड कार्पेटवर अवतरली Pooja Hegde

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:35 PM2022-05-19T15:35:04+5:302022-05-19T20:20:34+5:30

बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे तिच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटासाठी गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. दरम्यान, आता पूजा हेगडे कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पोहोचली आहे. (Photo Instagram)

कान्सच्या रेड कार्पेटवर पूजा हेगडे अतिशय सुंदर स्टायलिश अंदाजात दिसली, जे पाहून चाहते घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)

पूजा हेगडेने कान्सच्या रेड कार्पेटवरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पूजाच्या लेटेस्ट फोटोंमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे.(Photo Instagram)

फोटोंमध्ये, पूजा हेगडे व्हाईट रंगाच्या ऑफ शोल्डर डीप नेक गाउन परिधान केला आहे, ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. (Photo Instagram)

पूजा हेगडे बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानसोबत 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात झळकणार आहे. (Photo Instagram)

याशिवाय पूजा रणवीर सिंगसोबत सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक रोहित शेट्टीने केली आहे. (Photo Instagram)