Amrita Singh : सैफ अली खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंगने का केलं नाही दुसरं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 11:15 AM2023-02-09T11:15:48+5:302023-02-09T11:25:42+5:30

Amrita Singh Birthday: सगळं काही छान चाललं होतं. पण नंतर सैफ-अमृता यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. अखेर दोघांनी 2004 मध्ये घटस्फोट घेऊन परस्पर संमतीने 13 वर्षे जुनं नाते संपवलं...

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) ही एकेकाळची लोकप्रिय जोडी.पण दोघांचा कधीच घटस्फोट झालाये.

१९९१ साली अमृता व सैफचं लग्न झालं. खरं तर हे लग्न सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. कारण अमृता त्यावेळी आघाडीची हिरोईन होती आणि सैफचा तेव्हा डेब्यूही व्हायचा होता.

सैफ व अमृताचं लग्न चर्चेत येण्यामागं आणखीही एक कारण होतं. सैफ हा अमृतापेक्षा १२ वर्षांनी लहान होता. सैफने वयाने इतक्या मोठ्या अभिनेत्रीशी लग्न करावं, हे त्याकाळी अनेकांना पचनी पडलं नव्हतं.

अमृता व सैफचं लग्न झालं. कालांतराने दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलंही झाली. सगळं काही सुरळीत होतं. पण अचानक सैफ व अमृतात खटके उडू लागले.

दोघांमधील तणाव इतका वाढला की लग्नाच्या १३ वर्षानंतर २००४ मध्ये अमृता व सैफनं घटस्फोट घेतला. अमृता सारा व इब्राहिम या आपल्या दोन मुलांना घेऊन एकटी राहू लागली.

घटस्फोटानंतर चारच वर्षांनी सैफ करिना कपूरच्या प्रेमात पडला. २०१२ मध्ये सैफ व करिनाने लग्न केलं. अमृता मात्र दुसरं लग्न करण्याच्या भानगडीत पडली नाही.

सैफसारखं अमृताही दुसरं लग्न करू शकली असती. पण तिने दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावर ती आजपर्यंत ठाम राहिलीये.

अमृताने दुसरं लग्नं का केलं नाही तर, आपल्या दोन मुलांमुळे. सैफबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अमृता सिंग ही एकटी पडली होती. दोन्ही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिने एकटीने उचलली.

आता मी आणि माझी मुलं. मी त्यांच्यासाठीच जगेन, असं घटस्फोटानंतर अमृताने ठामपणे ठरवलं होतं. सैफपासून वेगळं झाल्यावर दोन्ही मुलांच्या पालनपोषणात तिला कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती. याच कारणामुळे तिने कधीच पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला नाही.