दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:51 IST2026-01-15T16:51:55+5:302026-01-15T17:51:25+5:30
Nora Fatehi Dating Achraf Hakimi: नोरा फतेहीचे एका हँडसम खेळाडूशी नाव जोडले जात आहे

बॉलिवूडची हॉट अँड फिट अभिनेत्री दिशा पाटनी आणि गायक तलविंदर सिंग एकमेकांना डेट करत असल्याची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरु आहे.

या चर्चा सुरु असतानाच आता बॉलिवूडची लोकप्रिय आयटम गर्ल नोरा फातेहीदेखील डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

नोरा फातेही हिचे नाव मोरोक्कोच्या अशरफ हकीमीशी याच्याशी जोडले जात आहे. जाणून घेऊया, कोण आहे चर्चेत आलेला अशरफ हकीमी....

अशरफ हकीमी हा मोरोक्कन फुटबॉलपटू आहे. नोरा फतेही आफ्रिकन कप ऑफ नेशन्स स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी गेली होती, तेव्हा ही चर्चा रंगली.

अशरफ हकीमी हा जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. तो सध्या पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि मोरोक्कन राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळतो.

गेल्या वर्षी UEFA लीग विजेत्या पीएसजी संघाचा हकीमी एक महत्त्वाचा भाग होता. त्याआधी तो इंटर मिलान आणि रिअल माद्रिद सारख्या प्रमुख क्लबसाठी खेळला.

स्पेनमधील माद्रिद येथे जन्मलेल्या हकिमीने रिअल माद्रिद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि आपल्या कामगिरीने त्याने जगातील अव्वल फुटबॉलपटूंच्या यादीत स्थान मिळवले.

अशरफ हा घटस्फोटित आहे. त्याचे लग्न स्पॅनिश अभिनेत्री हिबा अबुकशी झाले होते. २०२० मध्ये झालेले त्यांचे लग्न २०२३ मध्ये मोडले. या दोघांना दोन मुले आहेत.



















