काय सांगता? एका मिनिटासाठी उर्वशी घेते एक कोटी रुपये; कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना पाजलंय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 02:35 PM2023-07-16T14:35:16+5:302023-07-16T14:47:37+5:30

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कमाईच्या बाबतीत बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला सोशल मीडियाची स्टार आहे. तिला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करोडो लोक फॉलो करतात. आता तिने कमाईच्या बाबतीतही बॉलिवूडच्या दिग्गजांना मागे टाकले आहे.

उर्वशीच्या जबरदस्त फॅन फॉलोइंगचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की ती विराट कोहली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या टॉप १० मध्ये आहे.

उर्वशीला इंस्टाग्रामवर जवळपास ६७ मिलियन लोक फॉलो करतात. त्याचबरोबर फेसबुकवर उर्वशीच्या फॉलोअर्सची संख्या २८ लाखांपेक्षा जास्त आहे.

उर्वशी नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे मीडियाच्या चर्चेत असते. आजकाल ती टॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल चर्चेत आहे कारण तिला तिथे खूप मागणी आहे.

येत्या काही दिवसांत ती साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणसोबत बीआरओ या चित्रपटात दिसणार आहे.

यापूर्वी तिने सुपरस्टार चिरंजीवीच्या एका चित्रपटात एका सॉगमध्ये दिसली. अखिलच्या एजंट या चित्रपटातही तिला आयटम डान्स करायला मिळाले होते.

उर्वशीने बीआरओच्या आयटम डान्ससाठी ३ कोटी रुपये चार्ज घेतल्याचे समोर आले आहे. ते नृत्य ३ मिनिटांचे आहे. याचाच अर्थ उर्वशी प्रत्येक मिनिटाला एक कोटी रुपये आकारत आहे.

बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्री २-३ तासांच्या एका चित्रपटासाठी २ ते ५ कोटी रुपये घेतात यावरुन उर्वशीची ही फी किती मोठी आहे याचा अंदाज येतो.

इतकंच नाही तर उर्वशी इन्स्टाग्रामवर पेड पोस्टसाठी खूप पैसे घेते. ती एका पोस्टसाठी ३ ते ३.५ कोटी रुपये घेते.

उर्वशी रौतेलाची सध्याची एकूण संपत्ती ६ मिलियन डॉलर म्हणजे सुमारे ५० कोटी रुपये आहे. ती ४० ते ५० हजार डॉलर्स म्हणजेच ३५-४० लाख रुपये दरमहा तिच्या इतर कामांमधून सहज कमावते.