सामंथा, अनुष्का ते रश्मिका मंदानापर्यंत किती शिकल्या आहेत साऊथच्या टॉपच्या अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:28 PM2022-02-22T18:28:21+5:302022-02-22T18:39:38+5:30

South Indian Actress Education : आता तर साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. ते कसे राहतात? कुठे राहतात? काय खातात? किती शिकले आहे? हे फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय हे सांगणार आहोत.

South Indian Actress: साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. साऊथपुरत्या मर्यादीत असणाऱ्या स्टार्सना आता जगभरात ओळखलं जात आहे. पण साऊथ सिनेमांच्या हिंदी डबिंगमुळे ते घराघरात पोहोचले. त्यानंतर बाहुबली, जयभीम, पुष्पा या सिनेमांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. आता तर साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे. ते कसे राहतात? कुठे राहतात? काय खातात? किती शिकले आहे? हे फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज साऊथच्या अभिनेत्रींचं शिक्षण किती झालंय हे सांगणार आहोत.

रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) - रश्मिका म्हणजे पुष्पातील श्रीवल्ली आता नॅशनल कॅश बनली आहे. रश्मिकाने कोडागुतील पब्लिक स्कूलमध्ये सुरूवातीचं शिक्षण घेतलं. नंतर एम.एस.रमैया कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅन्ड कॉमर्समधून तिने सायकोलॉजी, जर्नालिज्म आणि इंग्लिश लिट्रेचरमधून ग्रॅज्यूएशन केलं.

समांथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) - आधी 'द फॅमिली मॅन २' आणि आता 'पुष्पा'तील सॉंगमुळे सामंथा फारच लोकप्रिय झाली आहे. सामंथाने चेन्नईच्या एंजल्स एंग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. त्यानंतर चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून तिने कॉमर्समधून ग्रॅज्यूएट केलं. सामंथाला फायनल इअरला असताना मॉडलिंगचा पहिला प्रोजेक्ट मिळाला होता.

श्रुति हसन (Shruti Haasan) - श्रुति हसनने मुंबईच्या सेंट एंड्रयूज कॉलेजमधून सायकॉलॉजीमध्ये ग्रॅज्यूएशन केलं. म्युझिकमध्ये आवड असल्याने श्रुति अमेरिकेला गेली, तिथे तिने Musicians Institute in California मधून म्युझिकचं शिक्षण घेतलं.

कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) - कीर्ती सुरेशने पर्ल अकॅडमीमधून फॅशन डिझायनिंगमधून ग्रॅज्यूएशन केलं. त्यानंतर स्कॉटलॅंडमध्ये राहून तिने चार महिन्यांचा कोर्स केला आणि नंतर लंडनमध्ये दोन महिने राहून इंटर्नशिप केली.

तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) - तमन्नाने तिचं शालेय शिक्षण मुंबईतील मानेकजी कूपर एज्यूकेशन ट्रस्ट स्कूलमधून पूर्ण केलं. कामात व्यस्त असल्याने नंतर तमन्नाने मुंबईच्या नॅशनल कॉलेजमधून डिस्टंन्स एज्युकेशनच्या माध्यमातून आर्टमधून ग्रॅज्यूएशन केलं.

पूजा हेगड़े (Pooja Hegde) - पूजा हेगडेने मुंबईच्या श्रीमती मीठीबाई मोतीराम कुंदनानी कॉलेज ऑफ कॉमर्समधून कॉमर्समधून ग्रॅज्यूएशन केलं. सिनेमात करिअर करण्याआधी पूजाने २०१० मध्ये मिस यूनिव्हर्स इंडिया पेजेंट स्पर्धेत भाग घेतला होता. यात ती रनर-अप होती.

रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) - रकुल प्रीत सिंहने दिल्ली यूनिव्हर्सिटीच्या जीसस अॅंड मेरी कॉलेजमधून मॅथ ऑनर्सची डिग्री घेतली आहे. तिने तिचं शालेय शिक्षण दिल्लीच्या आर्मी स्कूल पब्लिकमधून घेतलं.

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) - काजल अग्रवालने किशनचंद चेल्लाराम कॉलेजमधून मार्केटींग आणि अॅडव्हरटायजिंगमधून मास मीडियात ग्रॅज्यूएशन केलं आहे.

नयनतारा (Nayanthara) - नयनताराचे वडील एअरफोर्समध्ये होते. ज्यामुळे तिने वेगवेगळ्या शहरात शिक्षण घेतलं. तिने दिल्ली आणि जामनगरसहीत अनेक शहरात शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिरूवल्लाच्या मार्थोमा कॉलेजमधून आर्टमधून ग्रॅज्यूएशन केलं.

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) - साऊथची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्काने बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून BCA केलं आहे. त्यासोबतच योगा शिक्षामध्ये तिने सर्टिफिकेट कोर्स केला आहे.