बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार 'हे' बायोपिक; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:04 PM2024-01-03T20:04:49+5:302024-01-03T20:25:15+5:30

यंदा कोणते-कोणते बायोपिक प्रदर्शित होणार आहेत, हे जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आणि 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकवर आधारित 'मैं अटल हूं' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्यावरील बायोपिक 'चकडा एक्सप्रेस'मध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'द गुड महाराज' चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहे. अद्याप तारीख जाहिर करण्यात आलेली नाही. या सिनेमाची कथा महाराजा जाम साहिब दिग्विजयसिंझी रंजितसींझ यांच्यावर आधारित आहे. जे 1919 मध्ये ब्रिटीश आर्मीचे सेकंड लेफ्टनंट होते. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट 1952-62 या काळात भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. हा सिनेमाही याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

सौरव गांगुलीचा बायोपिकही यंदा प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, आयुष्मान खुराना या चित्रपटात मुख्य भूमिका अर्थात सौरव गांगुली हे पात्र साकारणार आहे.

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांचा बायोपिक करत आहे. ज्याने 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक गेम्समध्ये रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. हा चित्रपटही याच 2024 वर्षांत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दिग्दर्शक श्रीराम राघवन दिग्दर्शित 'एक्किस' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा दिसणार आहे. हा चित्रपट 1971 च्या युद्धातील नायक अरुष खेत्रपाल यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल यांची भूमिका साकारणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा ऐतिहासिक बायोपिक 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.