The Kerala Story सिनेमात हिजाबमध्ये दिसणारी आसिफा खऱ्या आयुष्यात 'ग्लॅमर क्वीन'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 08:48 PM2023-05-15T20:48:33+5:302023-05-15T21:01:01+5:30

'द केरला स्टोरी' चित्रपटातील असिफाचे रिअल लाइफमधले Bold & Beautiful Photos पाहिलेत का?

The Kerala Story Asifa, Sonia Balani Bold Photos: 'द केरल स्टोरी' चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासून कायम आहे. कथेवरून वाद असूनही सिनेमा तुफान चालतोय.

सिनेमा वादात सापडला असला तरी त्यातील ४ अभिनेत्रींच्या अभिनयाची स्तुती केली जात आहे. त्यातही खलनायिकेची भूमिका करणाऱ्या आसिफाची चर्चा आहे.

सिनेमातील आसिफा या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री संपूर्ण चित्रपटात हिजाब परिधान केला आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र ती खूपच ग्लॅमरस आहे.

द केरल स्टोरी सिनेमात आसिफाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नाव आहे सोनिया बलानी.

टीव्ही मालिकेतून तिने करियरला सुरूवात केली आणि सिनेमातील अभिनयाने साऱ्यांची वाहवा मिळवली.

संपूर्ण चित्रपटात हिजाब परिधान केलेली आसिफा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे आणि तिच्या फोटोंची सर्वत्र चर्चा आहे.

द केरल स्टोरी सिनेमामुळे सोनिया चर्चेत आली असली तरी या आधी तिने अनेक शो मध्ये काम केलं आहे. तसेच चित्रपटातही काम केलं आहे.

सोनियाने छोट्या पडद्यावर मालिकेत आपले नशीब आजमावले आहे. बड़े अच्छे लगते हैं, डिटेक्टिव दीदी, तू मेरा हीरो या मालिकांमध्ये ती दिसली आहे.

त्यासोबतच सैफ अली खानच्या 'बाझार' आणि तुम बिन 2 या सिनेमांमध्येही सोनियाने काम केलं आहे. काही वेब सिरीज मध्येही तिला अभिनयाची संधी मिळाली आहे.

मालिका आणि बेव सिरीजमध्ये चांगला अभिनय केल्याची पावती म्हणून तिला 'द केरल स्टोरी' सिनेमात प्रभावी भूमिकेची संधी मिळाली.

द केरल स्टोरी चित्रपटातील तिच्या खलनायिकेच्या भूमिकेला लोकांनी खूप पसंत केलं. त्यामुळेच या चित्रपटाने सोनियाला नवी ओळख मिळवून दिली.

सोनियाला अभिनयासोबतच डान्स आणि फिटनेसची खूप आवड आहे. मात्र इतर वैयक्तिक गोष्टींबाबत ती फारशी बोलत नाही.

वैयक्तिक आयुष्यात रिलेशनशीप किंवा इतर गोष्टींबाबत ती जास्त बोलत नाही. सध्या आपल्या करियवर फोकस करणार असल्याचे सोनियाने सांगितले आहे.

'द केरल स्टोरी'च्या यशानंतर आणखी चांगले सिनेमे वाट्याला येतील आणि कारकीर्द अधिक बहरत जाईल अशी तिची अपेक्षा आहे.

फोटो सौजन्य- सोनिया बालन (Sonia Balani Instagram)