'या' अभिनेत्रींनीही केला Miss World अन् Miss Universe होण्याचा प्रयत्न; पहिल्याच वेळी झाल्या फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 03:35 PM2021-12-16T15:35:28+5:302021-12-16T15:40:43+5:30

Tv actresses: हरनाज, लारा, सुश्मिता यांच्या व्यतिरिक्त कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे या अभिनेत्री कोण ते पाहुयात.

मॉडेल आणि अभिनेत्री हरनाज कौर संधूने (Harnaaz Kaur Sandhu) तब्बल २१ वर्षानंतर मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तिच्या नावाचीच चर्चा सुरु आहे. हरनाजपूर्वी लारा दत्ता, सुश्मिता सेन या अभिनेत्रींमुळे भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला होता.

हरनाज, लारा, सुश्मिता यांच्या व्यतिरिक्त कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे या अभिनेत्री कोण ते पाहुयात.

दीपानिती शर्मा - अभिनेत्री दीपानिता शर्मा (Dipannita Sharma) लक्षात आहे? खतरों के खिलाडी, 'हर दिल जो लव करेगा', 'बेवफा सी वफा' अशा मालिकांमध्ये ही अभिनेत्री झळकली आहे. तशीच 'लेडीज वर्सेज रिक्की बहल', 'जोड़ी ब्रेकर्स' आणि 'वॉर' या बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. दीपानितीने गौरी प्रधानसोबतच १९९८ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी दीपानिती टॉप ५ मध्ये पोहोचली होती. तसंच मिस इंडिया १९९८ मध्ये दीपानिता शर्माला मिस फोटोजेनिक हे टायटल मिळालं होतं.

गौरी प्रधान- 'क्युँकी सास भी कभी बहू थी', 'कुटुंब', 'तू आशिकी' अशा अनेक सुपरहिट मालिकांमध्ये झळकलेली गौरी प्रधान तेजवानी (Gauri Pradhan Tejwani) हिने वयाच्या १८ व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. १९९८ साली तिने 'फेमिना मिस इंडिया' (Femina Miss India 1998) मध्ये भाग घेतला होता.

स्मृती इराणी - अभिनेत्री आणि आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी १९९८ मध्ये 'मिस इंडिया' (Miss India) या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, टॉप ९ मध्ये स्थान मिळवण्यात त्यांना यश आलं नाही. स्मृती इराणी यांनी मॉडेलिंगपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती.

मिहिका वर्मा - मिहिका वर्मा (Mihika Varma) हे नाव कोणासाठीही नवीन नाही. 'ये है मोहब्बतें', 'बात हमारी पक्की' आणि 'ये है आशिकी' या मालिकांमध्ये झळकलेल्या मिहिकाने 'मिस इंडिया इंटरनॅशनल 2004' मध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे ही स्पर्धा तिने जिंकल्याचं सांगण्यात येतं.

पूजा शर्मा - 'महाभारत' आणि 'महाकाली-अंत ही आरंभ' फेम अभिनेत्री पूजा शर्मा (Pooja Sharma) ने 'मिस इंडिया 2006' मध्ये भाग घेतला होता. यावेळी ती टॉप १० मध्ये पोहोचली होती.

ऐश्वर्या सखूजा - 'ये हैं चाहतें' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऐश्वर्या सखूजाने (Aishwarya Sakhuja) 2006 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' त सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे ती फायनलपर्यंत पोहोचली होती.

गौहर खान- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खान(Gauahar Khan) हिनेदेखील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियात भाग घेतला होता. यावेळी ती टॉप ४ मध्ये पोहोचली होती. यावेळी तिला मिस टॅलेंटेड हा खिताब मिळाला होता. तसंच याच वर्षी तिने मिस इंटरनॅशलनमध्ये भारताचं प्रतिनिधित्वही केलं होतं.