आलिशान गाड्या ते लक्झरी लाईफस्टाईल; जाणून घ्या दिवसाकाठी लाखो कमावणाऱ्या जुबिन नौटियालचं Networth

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:45 PM2023-03-02T12:45:00+5:302023-03-02T12:45:00+5:30

Jubin nautiyal: जुबिन युट्यूब, कॉन्सर्ट शो, चित्रपट आणि म्युझिक अल्बम यांच्यातूनही कमाई करतो.

आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला भुरळ घालणारा लोकप्रिय गायक म्हणजे जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal).

उत्तम स्वरसाज लाभलेला जुबिन त्याच्या प्रोफेशनल लाईफसह वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर कायम त्याच्या नावाची चर्चा रंगतांना दिसते.

आजवरच्या कारकिर्दीत जुबिनने अनेक गाजलेली गाणी गायली आहेत. परंतु, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या शेहशाह चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत आला.

जुबिन आज लोकप्रिय गायक असल्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच त्याच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊयात.

शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या जुबिनने येथेच त्याचं करिअर घडवलं. सलमान खानच्या बजरंगी भाईजान, द हम्मा सॉन्ग या गाण्यांना आवाज देऊन तो प्रकाशझोतात आला.

सध्याच्या काळात सर्वाधिक कमाई करणारा गायक म्हणून जुबिनकडे पाहिलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार, जुबिन एका गाण्यासाठी ५ ते ७ लाख रुपये मानधन घेतो.

जुबिनला आलिशान गाड्यांची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे त्याच्याकडे व्हॉल्वो एक्ससी90, लेम्बोर्गिनी अवेंटाडोर, रोल्स रॉयस फँटम आणि बीएमडब्ल्यू एक्स9 या गाड्या आहेत.

जुबिन एका कॉन्सर्टसाठी ५० ते ६० लाख रुपये फी चार्ज करतो. त्यामुळे महिन्याला तो साधारणपणे ६६ ते ७० लाखांची कमाई करतो.

जुबिन युट्यूब, कॉन्सर्ट शो, चित्रपट आणि म्युझिक अल्बम यांच्यातूनही कमाई करतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, जुबिन नौटियालचं नेटवर्थ १६ मिलिअन डॉलर इतकं आहे. त्यामुळे भारतीय चलनानुसार, तो १२० कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.

बॉलिवूडसह त्याने तेलुगू, तामिळ, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्येही गाणी गायली आहेत. तसंच काही इंग्लिश वेबसीरिजसाठीही त्याने गाणी म्हटली आहेत.