'तो' फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने चाहत्यांसमोर दिली प्रेमाची कबुली? राहुल मोदीला करतेय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:14 PM2024-03-25T12:14:48+5:302024-03-25T12:27:03+5:30

श्रद्धा कपूरच्या फोटोतील 'ती' गोष्ट चाहत्यांना हेरली, राहुलसोबतच्या अफेअरच्या चर्चांना उधाण

अभिनेत्री श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्समध्ये प्रियंका चोप्रानंतर श्रद्धा कपूरचाच नंबर लागतो. तिचे तब्बल 88 लाख (88.5 मिलियन) फॉलोअर्स आहेत.

श्रद्धा प्रत्येक रविवारी तिचे खास फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करते. आता ते एका पद्धतीचं ritual त बनलं आहे. याला ती shrunday असंही म्हणते.

काल श्रद्धाने रविवारचा दिवस अगदी निवांत घालवला. तिने इन्स्टाग्रामवर तिचे काही सेल्फी शेअर केले. 'आज काहीच करत नाहीए कारण shrunday आहे.' असं कॅप्शन तिने दिलं. पण या फोटोत असं काहीतरी खास होतं ज्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं.

श्रद्धा गेल्या काही दिवसांपासून एकाला डेट करत आहे. तो आहे राहुल मोदी (Rahul Mody). राहुल पटकथा लेखक आहे. श्रद्धा आणि रणबीर कपूरच्या 'तू झुठी मै मक्कार' सिनेमाचा तोच लेखक होता.

याच सिनेमावेळी त्यांच्यात मैत्री झाली. यानंतर दोघंही एकमेकांना डेट करायला लागले अशी चर्चा होती. त्यांना मुंबईत एका रेस्टॉरंटमध्येही पाहिलं गेलं. मात्र श्रद्धाने कधीच यावर अधिकृत माहिती दिली नाही.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या अंबानींच्या ग्रँड प्री वेडिंग पार्टीत श्रद्धासोबत राहुल मोदीही दिसून आला. तेव्हा श्रद्धाने काहीच लपवायचाही प्रयत्न केला नाही. इतकंच काय तिने आदित्य रॉय कपूरशी त्याची ओळखही करुन दिली.

या पार्टीनंतर मात्र श्रद्धाचं फक्त अफेअरच गाजत नाहीए तर तिच्या लग्नाचीही चर्चा आहे. श्रद्धा आणि राहुल दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

काल श्रद्धाने पोस्ट केलेल्या फोटोतही चाहत्यांचं लक्ष वेधलेली गोष्ट म्हणजे तिच्या गळ्यातलं लॉकेट. R या अक्षराचं पेंडंट तिने घातलं होतं. यामुळे श्रद्धाने राहुलसोबत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे का अशी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली.