हेराफेरी, भुलभुलैया ते कबीर सिंग! ओरिजिनलपेक्षा रिमेक झाले हिट; 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 04:51 PM2023-11-06T16:51:56+5:302023-11-06T17:10:13+5:30

बॉलिवूडमध्ये रिमेक चित्रपटांचा ट्रेंड जुना आहे. अनेक रिमेक हे मूळ चित्रपटांपेक्षा जास्त हिट झाले आहेत. आता ती ओटीटीवरही आपली जादू दाखवत आहे.

1975 मध्ये रिलीज झालेला 'शोले' हा हॉलिवूड चित्रपट 'द मॅग्निफिसेंट सेव्हन'चा रिमेक आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

1993 मध्ये रिलीज झालेला 'बाजीगर' हा हॉलिवूड चित्रपट 'अ किस बिफोर डायिंग'चा रिमेक आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

'हेराफेरी' हा मल्याळम चित्रपट 'रामजी राव स्पीकिंग'चा रिमेक आहे. 'हेराफेरी' हा 2000 मध्ये रिलीज झाला होता. रिमेक असूनही हा चित्रपट हिट ठरला होता.

2003 मध्ये रिलीज झालेला 'मुन्ना भाई एमबीबीएस' हा हॉलिवूड कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'पॅच अ‌ॅडम्स' चा रिमेक आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

'भूल भुलैया' हा 2007 मध्ये रिलीज झाला होता. हा मल्याळम चित्रपट 'मणिचित्रथाझू'चा रिमेक आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

“2 अक्तूबर को क्या हुआ था?”, हा प्रश्न सिनेप्रेमींना चांगलाच माहीत असेल. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटातील हा डायलॉग तुफान गाजला. यावर आजही मीम्स व्हायरल होतात. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 'दृश्यम' हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.

'कबीर सिंग' हा सिनेमा तेलगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. 'कबीर सिंग' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. 'कबीर सिंह'ने बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. कबीर सिंग सिनेमात शाहिद कपूरने मुख्य भूमिका साकरली आहे.