गोल्डन गर्ल शेहनाझ गिलने साडीत केलं स्टायलिश फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:07 IST2024-07-08T12:59:30+5:302024-07-08T13:07:01+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री शेहनाझ गिल तिच्या क्यूटनेस आणि चुलबुल अदांसाठी ओळखली जाते.
शेहनाझ ही सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
सोशल मीडियावर शेहनाझ तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत अपडेटही देत असते.
शेहनाझ अनेकदा चाहत्यांना तिच्या नव्या लूकची झलक दाखवते.
आता शेहनाझ गिलने लेटेस्ट फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या फोटोंमध्ये शेहनाझ एका सुंदर साडीमध्ये दिसून येत आहे.
शेहनाझ हिने सोानेरी रंगाची साडी नेसली आहे. यावर तिनं बॅकलेस ब्लाउज आणि सुंदर असा नेकलेस परिधान केला आहे.
शेहनाझच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.
सध्याच्या घडीला शहनाज गिल हे नाव बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत गणलं जातं.
गेल्या वर्षभरापासून शहनाज, पंजाबी गायक गुरु रंधावाला (guru randhawa) डेट करत असल्याची चर्चा आहे.