'डंकी' चित्रपटासाठी शाहरुख खाननं घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या बाकी स्टारकास्टची फी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:59 AM2023-11-06T11:59:05+5:302023-11-06T12:05:38+5:30

Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान डंकीमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

२०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान डंकीमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे.

२२ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमण ईराणी आणि सतीश शाह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन घेतल्याचे समोर आले आहे.

डंकी चित्रपटात शाहरुख खान हार्डीच्या भूमिकेत दिसणार आहे. फिल्मीबीटच्या रिपोर्टनुसार, किंग खानने या चित्रपटासाठी २८ कोटी रुपये मानधन घेतले आहे. त्याने पठाण आणि जवानसाठी देखील जवळपास एवढे मानधन घेतले होते.

विकी कौशलने डंकीमध्ये सुखीची भूमिका साकारली आहे. विकीने या चित्रपटासाठी १२ कोटी मानधन घेतले असल्याचे बोलले जात आहे. विकी आणि राजकुमार हिराणी यांनी यापूर्वी संजू चित्रपटात एकत्र काम केले आहे.

तापसी पन्नू या सिनेमात मनुच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक चाहत्यांना खूप भावला आहे. या चित्रपटासाठी तिने ११ कोटी मानधन घेतल्याचे बोलले जात आहे.

बोमण ईराणी यांनी डंकीमध्ये गुलाटी नामक एका शिक्षकाची भूमिका बजावली आहे. या रोलसाठी त्यांनी १५ कोटी मानधन घेतले आहे.

अभिनेता सतीश शाह मैं हूं ना चित्रपटानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर डंकीत शाहरुखसोबत पुन्हा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी ७ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

डंकी चित्रपट २२ डिसेंबरसा रिलीज होणार असून त्याचा बॉक्स ऑफिसवर सालार: पार्ट १ सीजफायरसोबत सामना होणार आहे.