'बॉयफ्रेंड'ला वैतागली होती रेखा, 'नाइट आउट करू शकत नाही, त्याला घरी जाऊन दूध प्यायचं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:32 PM2023-01-17T13:32:02+5:302023-01-17T13:46:42+5:30

Rekha : आपल्या पार्टनर किंवा बॉयफ्रेंड्सवर तुम्ही कितीही प्रेम कराल तरी, त्यांच्या काही अशा सवयी असतात ज्यामुळे तुम्हाला वैताग येतो.

Rekha annoyed by ex boyfriend : रेखा तिच्या काळातील अशा बोल्ड हिरोईन्सपैकी होती जी नेहमीच तिच्या मनातील गोष्टी बिनधास्तपणे मीडियासमोर बोलत होती. तिच्या या बिनधास्त बोलण्यामुळेच तिला बोल्ड मानलं जात होतं. आपल्या याच अंदाजात एकदा रेखाने एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'बॉयफ्रेंड' च्या एका सवयीबाबत सांगितलं होतं, ज्याचा तिला खूप वैताग येत होता.

आपल्या पार्टनर किंवा बॉयफ्रेंड्सवर तुम्ही कितीही प्रेम कराल तरी, त्यांच्या काही अशा सवयी असतात ज्यामुळे तुम्हाला वैताग येतो. कधी या सवयींमुळे तुम्ही चिडचिड करता तर कधी यामुळे कपलमध्ये वाद होतो. असाच एक किस्सा समोर आला होता. रेखा आणि तिच्या तेव्हाच्या बॉयफ्रेंडचा.

नाही नाही....हा किस्सा अमिताभ बच्चन यांच्याबाबत नाहीये. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची चर्चा सुरू होण्याआधी रेखा अभिनेता किरण कुमार याला डेट करत होती. हे अफेअर खूप गाजलं होतं.

स्टारडस्ट मॅगझीनली जानेवारी 1975 च्या एडिशनला दिलेल्या मुलाखतीत रेखाने किरण कुमारच्या या चिढ येणाऱ्या सवयीबाबत उल्लेख केला होता. केवळ रेखाच नाही तर किरण कुमार यानेही सांगितलं होतं की, कशाप्रकारे रेखा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आवाजाची नकल करून त्याला त्रास देत होती.

रेखाने सांगितलं होतं की, ती किरण कुमारच्या 'मम्‍मा बॉय' असण्याने फार परेशान होती. रेखाने या लेखात सांगितलं होतं की, 'आम्ही रात्री उशीरापर्यंत फिरण्याचा प्लान करू शकत नाही. कारण तो कोणत्याही स्थितीत 10 वाजता घरी पोहोचतो, जेणेकरून त्याला दूध पिता यावं. त्याची ही सवय मला अजिबात आवडत नव्हती. तुम्हाला नाही वाटत का की, मला जास्तीत जास्त "Mama's Boy" मिळाले आहेत.

तेच रेखाच्या सवयीबाबत किरण कुमारने सांगितलं होतं की, 'मला खूप राग येतो जेव्हा ती माझ्या एक्‍स गर्लफ्रेंडच्या आवाजाची नक्कल करून माझ्यासोबत फोनवर बोलते. आणि जेव्हा सन्मानासाठी मी जेव्हा प्रेमाने बोलतो तेव्हा तिला राग येतो'.

रेखा आणि किरण कुमार यांच्या डेट करण्याच्या बातम्या त्यावेळ नेहमीच समोर येत होत्या. पण त्यावेळी रेखा मुख्य भूमिका करत होती आणि किरण कुमार व्हिलन आणि साइड रोल करत होता. किरण कुमार एकदा बोललाही होता की, माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड फार यशस्वी झाल्या आणि कदाचित हेच माझ्यासाठी चांगलं राहिलं नाही.

तेच दुसरीकडे रेखा फार बिनधास्त आणि बोल्ड अशी हिरोईन होती. त्यावेळी तिने अनेक वादग्रस्त विधान समोर येत होते. रेखा केवळ एक लाइन बोलायची आणि त्यावरून अनेक अफवा पसरत होत्या. अशात किरण कुमारचे वडील अभिनेता जीवन यांना वाटत होतं की, रेखा त्यांच्या घरची सून होऊ नये. रेखाला याचा धक्का बसला होता की, वडिलांनी सांगितलं म्हणून किरणने तिला साथ दिली नाही.