विवाहित प्रभूदेवा 'नयनतारा'च्या प्रेमात आकंठ बुडाला होता, घटस्फोट झाला अन् प्रेमालाही मुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 09:41 AM2023-04-03T09:41:02+5:302023-04-03T10:00:32+5:30

डान्सर प्रभूदेवा आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रसिद्ध डान्सर प्रभूदेवा (Prabhudeva) आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तम डान्सरसोबतच त्याची अभिनेता आणि दिग्दर्शक अशीही ओळख आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेला प्रभूदेवाच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक वादळं आली.

प्रभूदेवाने 1995 साली क्लासिकल डान्सर रामलताशी लग्न केलं होतं. त्यांनी तीन मुलंही झाली. मात्र मोठा मुलगा विशालचे लहानपणीच 2008 साली कर्करोगाने निधन झाले. प्रभूदेवासाठी तो वाईट काळ होता. मात्र प्रभूदेवाच्या आयुष्यातलं वादळ इथेच थांबलं नाही.

विवाहित प्रभूदेवा नंतर साऊथ मधील आघाडीची अभिनेत्री नयनताराच्या (Nayanthara) प्रेमात आकंठ बुडाला. एका चित्रपटातील गाण्यासाठी प्रभूदेवा तिचा कोरिओग्राफर होता. याचदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांची लव्हस्टोरी तेव्हा चांगलीच चर्चेचा विषय होती.

प्रभूदेवा आणि नयनतारा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा वाढतच चालली होती. विवाहित प्रभूदेवा नंतर नयनतारासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्याचीही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याची पत्नी रामलताला हे समजलं. प्रभूदेवाने तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. मात्र रामलताने त्याला सरळ नकार दिला.

असं म्हणतात नयनताराने स्वत: रामलताला लाच देण्याचाही प्रयत्न केला. तिला वाटले रामलता स्वत:हून प्रभूदेवाला सोडेल मात्र असं झालं नाही. अखेर 2010 मध्ये रामलताने प्रकरण कौटुंबिक न्यायालयात नेलं. प्रभूदेवाच्या लिव्ह इन रिलेशनशिपविषयीही माहिती दिली.

2011 साली मात्र दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर नयनतारा आणि प्रभूदेवाचंही नातं टिकलं नाहीच. त्यामुळे प्रभूदेवा एकटा पडला. अशा प्रकारे नयनतारा आणि प्रभूदेवाची लव्हस्टोरी अपूर्णच राहिली.

दुसरीकडे गेल्यावर्षी नयनताराने दिग्दर्शक विग्नेश शिवनशी लग्न केले. नुकतेच तिने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. 38 वर्षीय नयनतारा शाहरुख खानसोबत जवान सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. नयनताराच्या लग्नात शाहरुखनेही हजेरी लावली होती.

आज प्रभूदेवा डान्सचा बादशाह आहे.त्याला भारताचा मायकल जॅक्सन असंही म्हटलं जातं. प्रभूदेवाने 2009 साली आलेल्या सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यासोबतच त्याने सलमानचं बुडतं करिअर वर आणलं होतं.