Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची लेक ‘डेब्यू’साठी सज्ज, बॉलिवूड नव्हे गाजवणार हॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 04:10 PM2022-10-14T16:10:47+5:302022-10-14T16:16:49+5:30

Mithun Chakraborty daughter Dishani : लवकरच मिथुन यांचा लहान मुलगा नमाशीचा बॉलिवूड डेब्यू होतोय आणि आता मुलगी दिशानी ही सुद्धा मनोरंजनसृष्टीत डेब्यू करतेय...

सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा महाक्षय उर्फ मिमोह बॉलिवूडमध्ये अपयशी ठरला. लवकरच मिथुन यांचा लहान मुलगा नमाशीचा बॉलिवूड डेब्यू होतोय आणि आता मुलगी दिशानी ही सुद्धा मनोरंजनसृष्टीत डेब्यू करतेय.

होय, मिथुन यांची मुलगी दिशानी ही बॉलिवूडमध्ये नव्हे तर थेट हॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. हॉलिवूडच्या ‘द गेस्ट’ या शॉर्टफिल्म्समधून दिशानीचा डेब्यू होतोय.

दिशानीचा ‘द गेस्ट’ या शॉर्ट फिल्म्सचं अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात कौतुक झालं. विशेषत: दिशानीचा अभिनयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं.

अभिनेत्री म्हणून करिअर सुरू करण्याआधी दिशानीने मुंबईच्या जेफ गोल्डबर्ग स्टुडिओत आणि नंतर न्यूयॉर्कच्या फिल्म अ‍ॅकेडमीत अ‍ॅक्टिंग आणि फिल्म मेकिंगचे धडे गिरवले.

लॉस एंजिल्सच्या ‘स्ट्रासबर्ग थिएटर एंड फिल्म इंस्टीट्यूट’ मध्ये दिशानी दोन वर्ष शिकत होती. आता तिच्याकडे हॉलिवूडचे दोन प्रोजेक्ट आहेत.

लॉस एंजिल्समध्ये पहिल्या वर्षाच्या शेवटी दिशानीने तिथे एका नाटकात काम केलं, या नाटकात तिने हॉलिवूड स्टार अल पचीनोबरोबर काम केलं आहे. अभिनयाबरोबरच दिशानीला एक लेखिका व्हायचं आहे.

दिशानीबाबत सांगायचे झाल्यास तिला मिथुन चक्रवर्ती यांनी दत्तक घेतले होते. रिपोर्टनुसार, तिच्या आई-वडिलांनी कचराकुंडीजवळ सोडून दिले होते. एका एनजीओच्या लोकांनी तिला वाचवले. ही गोष्ट जेव्हा मिथुन यांना कळाली तेव्हा त्यांनी त्या मुलीला दत्तक घेण्याचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयास पत्नी योगिता बालीनेही सहमती दर्शवली.

कचराकुंडीत सापडलेल्या मुलीला दत्तक घेऊन मिथुन यांनी तिचं दिशानी असं नामकरण केलं. मिथुन फक्त दिशानीचे पापा नाहीत तर त्यांना ती हिरो मानते.

मी वाडिलांकडून मिळालेल्या सल्ल्यावर एक संपूर्ण पुस्तक लिहू शकते. त्यांनी एक खास सल्ला माझ्या भावांना आणि मला दिला तो असा की, तुम्ही पहिले चांगला माणूस म्हणून स्वत:ला घडवा. मला मी माझ्या वडिलांनी दाखवलेल्या या मार्गावरच चालणार, असं दिशानी म्हणते ते म्हणूनच.

दिशानी सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 74 हजारहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

दशानी स्टायलिश असून सोशल मीडियावरील तिच्या लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दिशानी बॉलिवूड सुपर स्टार सलमानची मोठी चाहती आहे.