Mili Screening PHOTOS : रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 03:10 PM2022-11-04T15:10:11+5:302022-11-04T15:29:56+5:30

Rekha Showers Love On Janhvi Kapoor at Mili Screening : ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत.

जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा सिनेमा आज रिलीज झाला. काल या चित्रपटाची खास स्क्रिनिंग ठेवली गेली. यावेळी अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत.

स्क्रिनिंगदरम्यान जान्हवी व रेखा यांच्यातील बॉन्डिंग बघण्यासारखी होती. रेखा यांनी जान्हवीचं अगदी आईसारखं लाडकौतुक करताना दिसली.

जान्हवी आणि रेखा यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रेखा यांनी जान्हवीला प्रेमाने मिठी मारली. तिचं मायेने चुंबन घेतलं. तिचं मनातून कौतुक केलं.

दोघींनी कॅमेऱ्याला मस्तपैकी पोझही दिल्या. यावेळी रेखा यांनी चंदेरी साडी नेसली होती. या साडीत त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या.

रेखा यांनी जान्हवीवर अगदी प्रेमाचा वर्षाच केला. आईच्या मायेनं त्या स्क्रिनिंगला हजर राहिल्या. जान्हवी यामुळे भारावून गेली.

सनी सुद्धा रेखा यांना भेटला. यावेळी रेखा यांच्याबद्दलचा आदर त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसला.

रेखा भेटताच सनी कौशलने त्यांच्या पायांना स्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. सनी कौशलच्या या कृतीने चाहत्यांची मनं जिंकून घेतली.

‘मिली’ हा सिनेमा जान्हवी कपूरचे पापा बोनी कपूर यांनी प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटात सनी कौशलही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्यामुळे सनीचं अख्ख कुटुंब या स्क्रिनिंगला हजर होतं.

विकी कौशल हा सुद्धा या स्क्रिनिंगला हजर होता. भावाचा सिनेमा म्हटल्यानंतर त्याने आवर्जुन ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.

जान्हवीच्या मैत्रिणी सारा अली खान व अनन्या कपूर या दोघींनींही ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.