वयाच्या पन्नाशीमध्येही Fit & Maintain आहे मंदिरा बेदी; मल्टीकलर बिकिनीमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:45 AM2022-07-19T11:45:38+5:302022-07-19T11:48:58+5:30

Mandira bedi: विशेष म्हणजे वयाची ५० पार केल्यानंतरही मंदिराने स्वत:ला प्रचंड फिट ठेवलं आहे. त्यामुळे तिचा फिटनेस एखाद्या विशीच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. यात तिच्या अभिनयापेक्षा बोल्डनेसची अधिक चर्चा होते.

मंदिरा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच मंदिराने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केली असून ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

विशेष म्हणजे वयाची ५० पार केल्यानंतरही मंदिराने स्वत:ला प्रचंड फिट ठेवलं आहे. त्यामुळे तिचा फिटनेस एखाद्या विशीच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.

या फोटोवरुन मंदिरा सध्या व्हेकेशन मूडमध्ये असल्याचं पाहायला मिळतं.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये मंदिराने मल्टीकलर बिकिनी परिधान केली आहे.

मंदिराचा आजच्या घडीला मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. इन्स्टाग्रामवर तिचे १.९ मिलिअन फॉलोअर्स आहेत.

मंदिरा वरचेवर नवनवीन ठिकाणांना भेट देत असून येथील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.