मलायका ते अनुष्का शर्मा! फिट राहण्यासाठी 'या' बॉलिवूड अभिनेत्री घेतात योगचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:00 PM2023-06-21T16:00:35+5:302023-06-21T16:11:45+5:30

Bollywood actress: कलाविश्वातील अनेक अभिनेत्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगचा आधार घेतात.

नर्गिस फाखरी - अभिनेत्री नर्सिग फाखरी कायमच तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. नर्गिस दररोज न चुकता योग करुन स्वत: ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते.

जागतिक योग दिनाचं निमित्त साधत नर्गिसने तिचे योग करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मलायका अरोरा - वय म्हणजे निव्वळ आकडा असतो हे मलायकाने तिच्या फिटनेसमधून दाखवून दिलं आहे.

मलायका न चुकता योग आणि वर्कआऊट करते.

करिना कपूर- झिरो फिगरसाठी ओळखली जाणारी बेबो तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

करिनादेखील न चुकता योग करत असून याचे काही फोटो, व्हिडीओदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अनुष्का शर्मा - आपल्या बिनधास्त आणि मस्तीखोर स्वभावामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा.

अनुष्का तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. त्यामुळे प्रेग्नंसीच्या काळातही ती योग करुन स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत होती.

अंकिता लोखंडे - पवित्र रिश्ता या मालिकेतून नावारुपाला आलेली अंकिता तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

अंकिताने कुटुंबासोबत योगासने करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.