Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:09 IST2025-10-31T08:57:05+5:302025-10-31T09:09:26+5:30
Sushant Singh Rajput : सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती अनेकदा त्याच्याबद्दल बोलते. पुन्हा एकदा तिने अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल एक धक्कादायक दावा केला.

"पवित्र रिश्ता" या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने फिल्म इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला. त्याने ‘काय पो छे!’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला.

२०२० ची सकाळ सुशांतच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी खूप त्रासदायक ठरली कारण वयाच्या ३४ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. त्याच्या मृत्यूला पाच वर्षे झाली आहेत, परंतु त्याचे चाहते अजूनही त्याची आठवण काढतात आणि त्याला न्याय मिळावा अशी मागणी करतात.

सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती अनेकदा त्याच्याबद्दल बोलते. पुन्हा एकदा तिने अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल एक धक्कादायक दावा केला, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की तिच्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे.

पत्रकार शुभंकर मिश्रा यांच्याशी मुलाखतीत बोलताना श्वेताने खुलासा केला की, अमेरिका आणि मुंबईत राहणाऱ्या दोन सायकिकने सांगितलं की, सुशांतची हत्या दोन लोकांनी केली होती.

श्वेताच्या विधानामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जून २०२० मध्ये सुशांतच्या मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. त्याच्या मृत्यूने मीडियामध्ये खळबळ उडाली आणि मुंबई पोलीस, एनसीबी आणि सीबीआयने तपास केला. यापैकी कोणत्याही एजन्सीला गैरप्रकाराचे पुरावे सापडले नाहीत.

सत्य वेगळे आहे असा युक्तिवाद करत श्वेता अजूनही या निष्कर्षाशी सहमत नाही. मुलाखतीत श्वेताने प्रश्न उपस्थित केला की, जर खोलीत एखाद्या व्यक्तीला गळफास घेण्यासाठी पुरेशी जागा नव्हती तर ही आत्महत्या कशी असू शकते?

ती म्हणाली, "पंखा आणि बेडमध्ये पाय लटकत राहतील इतकं पुरेसं अंतर नव्हतं. जर कोणी आत्महत्या केली तर ते स्टूल वापरतात, परंतु तिथे स्टूल नव्हता. ज्या खुणेबद्दल चर्चा होत होती ती दुपट्ट्याची नव्हती, तर एका पातळ चेनसारखी खूण होती."

श्वेताने पुढे खुलासा केला की, "तिच्या भावाच्या मृत्यूनंतर लगेचच अमेरिकेतील एका सायकिकने तिच्याशी संपर्क साधला. ती महिला अमेरिकेची होती आणि तिला आमच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. तिने सांगितले की, सुशांतची हत्या झाली आहे."

"दोन लोक आले आणि हे सर्व केलं, असं तिने कोणत्याही माहितीशिवाय हे सांगितलं." श्वेताच्या विधानाने सर्वांना आश्चर्यचकित केलं. तिने पुढे स्पष्ट केले की काही काळानंतर मुंबईतील आणखी एका सायकिकने तिच्याशी संपर्क साधला आणि अगदी सेम सांगितलं.

श्वेता म्हणाली, "मी त्या महिलेला ओळखत नव्हती. पण तिनेही अमेरिकन सायकिकसारखंच सेम टू सेम सांगितलं. दोघांनीही सांगितलं की, दोन लोकांनी येऊन सुशांतची हत्या केली." दोन वेगवेगळ्या लोकांकडून अशा समान गोष्टी ऐकून श्वेताला विचार करायला भाग पाडलं.

सीबीआयच्या अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे की, सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणत्याही कटाचा किंवा जबरदस्तीचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. अहवालानुसार, रिया चक्रवर्ती किंवा इतर कोणीही त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं नाही. मात्र कुटुंब या निष्कर्षाशी असहमत आहे.

कुटुंबाचे वकील वरुण सिंह म्हणाले, "हा सर्व एक दिखावा आहे. जर सीबीआयला सत्य उघड करायचं असतं तर त्यांनी सर्व पुरावे सादर केले असते. आम्ही या अहवालाविरुद्ध याचिका दाखल करू."


















