'लापता लेडीज'मधील अभिनेत्री आहे फेमस सोशल मीडिया स्टार; Inside Edge 2 मध्ये केलंय यापूर्वी काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 02:14 PM2024-02-14T14:14:45+5:302024-02-14T14:22:12+5:30

Nitanshi goyal: नितांशीला वयाच्या 16 व्या वर्षी लागली सिनेमाची लॉटरी

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या लापता लेडीज या सिनेमाची चर्चा रंगली आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन किरण राव करत असून या चित्रपटामध्ये दिल्लीच्या नितांशी गोयल या १६ वर्षाच्या तरुणीने मुख्य भूमिका साकारली आहे.

नितांशीला वयाच्या १६ व्या वर्षी आमिर खानच्या चित्रपटात काम करायला मिळत असल्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये तिची चर्चा रंगली आहे. यात खासकरुन दिल्लीच्या या तरुणीची सिनेमासाठी निवड कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नितांशीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. माझ्याकडे ऑडिशनसाठी ३ सीन आले होते. त्यावेळी हा सिनेमा आमिर सर करतायेत हे मला माहित नव्हतं. मी फक्त त्या स्क्रिप्टचे ३ पानं वाचली. ते तीनही सीन वाचल्यावर माझं असं झाली की काहीही करुन हा सिनेमा मला करायचा आहे, असं नितांशी म्हणाली.

पुढे ती म्हणते, या सिनेमासाठी शक्य होईल तशी मी तयारी केली. धागा (अनुष्का शर्मा-वरुण धवन मूवी), बालिका वधू (सीरियल) यांसारख्या अनेक भोजपुरी महिलांचे व्हिडीओ मी पाहिले. ज्यामुळे त्या स्त्रिया कशा वावरतात ते मला कळेल.

नितांशी गोयल हे नाव सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या तरुणांना नक्कीच माहित असेल. नितांशी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून तिचे १० मिलिअनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

नितांशी उत्तर प्रदेशच्या नोएडामधील असून १२ जून २००२ मध्ये तिचा जन्म झाला आहे. नितांशीचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा असल्याचं म्हटलं जातं. मात्र, यापूर्वी तिने मालिकांमध्ये काम केलं आहे.

नितांशीने २०१६ मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. मन मैं है विश्वास या मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तिने शबरीची भूमिका केली होती.

नितांशीने नागार्जुन एक योद्धा, थपकी प्यार की, पेशवा बाजीराव, कर्मफल दाता शनी यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.

नितांशी इनसाइट एज-2 या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.