IN PICS : मी टायगरला कधीच डेट करणार नाही..., क्रिती सॅननने दिलं अजब कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:03 PM2022-08-29T18:03:54+5:302022-08-29T18:18:42+5:30

Koffee With Karan 7, Kriti Sanon : ‘कॉफी विथ करण 7’चा प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यात क्रितीने केलेला खुलासा पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत...

‘कॉफी विथ करण 7’ हा शो लोकप्रिय टॉक सध्या चांगलाच गाजतोय. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आणि अभिनेता टायगर श्रॉफ हजेरी लावणार आहेत.

तूर्तास या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यात क्रितीने केलेला खुलासा पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

तुम्हाला ठाऊक असेलच की, टायगर व क्रिती दोघांनी ‘हिरोपंती’ या चित्रपटामधून एकाचवेळी बॉलिवूड डेब्यू केला होता. पण टायगरला डेट करण्यात मात्र क्रितीला जराही इंटरेस्ट नाही.

होय, टायगरने तुला कधीच अ‍ॅप्रोच केलं नाही, याचं कधी वाईट वाटत नाही का? असा प्रश्न करण जोहर तिला विचारतो. यावर, मी कधीच टायगरला डेट करू इच्छित नाही. कारण तो खूप जास्त फ्लिप करतो, लगेच पलटी मारतो, असं क्रिती म्हणाली. यावर सगळेच हसायला लागले.

याच शोमध्ये क्रिती करण जोहरची मस्करी करताना दिसली. तिने करण जोहरची जणू बोलती बंद केली. मी ‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी ऑडिशन दिलं होतं पण मला रिजेक्ट करण्यात आलं, असं क्रितीने सांगितलं. हे ऐकून करणला काय बोलावं हेच सुचेना.

‘हीरोपंती’ या चित्रपटामधून क्रिती आणि टायगर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हे दोघे आता ‘गणपत’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

क्रिती सॅनन ही आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर नेनोक्कडाइन हा क्रितीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी क्रिती सेननला समीक्षकांकडून खूप कौतुकही मिळालं.

नानोक्कडाइन 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर क्रितीनं बॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिरोपंती’ हा तिचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.