Record Breaking लग्न! सिद्धार्थ-कियाराच्या विवाहाने रचला अनोखा विक्रम; बॉलिवूडच्या कपल्सना टाकलं मागं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:42 PM2023-02-10T12:42:42+5:302023-02-10T17:35:00+5:30

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये झालेल्या या शाही लग्नाची चर्चा सगळीकडे आहे. सिड-कियाराने भल्याभल्याने मागं टाकलं आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. साहजिकच, त्याचे चाहते त्याच्या लग्नाच्या फोटोंची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. (फोटो इन्स्टाग्राम)

सिड-कियाराने शाही थाटात राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्नगाठ बांधली. या सुंदर जोडप्याच्या ग्रँड वेडिंगचे फोटोंनी सोशल मीडियावरही वर्चस्व गाजवले आहे.( फोटो इन्स्टाग्राम)

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नाचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा त्यावर रेकॉर्ड ब्रेक लाईक्स आले. कियारा-सिद्धार्थ या फोटोला आतापर्यंत 23 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. याआधी सर्वात जास्त लाईक्स कतरिना-विकीच्या फोटोला मिळाले होते. ( फोटो इन्स्टाग्राम)

कियारा-सिद्धार्थच्या आधी विकी आणि कतरिनाच्या लग्नाच्या फोटोंना सर्वाधिक लाइक्स आले होते. दोघांना मिळून 20.4 मिलियन लाईक्स मिळाले होते. कियारा-सिद्धार्थप्रमाणेच या दोघांनीही लग्नासाठी राजस्थानची निवड केली होती.( फोटो इन्स्टाग्राम)

आलिया भट आणि रणबीर कपूरचे चाहते त्यांच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आलिया-रणबीरच्या लग्नाच्या फोटोला 13.19 मिलियन लाईक्स मिळाले आहेत.( फोटो इन्स्टाग्राम)

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या फोटोला 10.7 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. ( फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच, अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या पोस्टला 8.3 मिलियन लाइक्स मिळाले. ( फोटो इन्स्टाग्राम)

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते, दोघांनीही भारताबाहेर जाऊन इटलीत लग्न केले होते. या दोघांच्या लग्नाच्या पोस्टवर जवळपास 7.8 मिलियन लाईक्स आले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या प्रियांका चोप्रालाही तिच्या लग्नाला 6.7 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. तिने राजस्थानमधील उम्मेद पॅलेसमध्ये हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्न केले. (फोटो इन्स्टाग्राम)

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या फोटोंना 5.73 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. दोघांनी 24 जानेवारी 2021 रोजी एका खाजगी समारंभात लग्न केले. (फोटो इन्स्टाग्राम)